Saam Tv
प्रॉपर्टी आणि गुंतवणुकीचे प्रस्ताव समोर येतील. कामानिमित्त प्रवास, दिवस संमिश्र आहे.
जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर पुढे जाल. जोडलेल्या लोकांपासून नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. कुठेतरी विश्वास, श्रद्धा ठेवणे आज गरजेचे आहे.
अचानक धनलाभाची शक्यता आहे. आज काहीजणांचे पैसे योग्य वेळेवर वसूल होतील.
आपण जे काम करता ते अगदी मन लावून करता. हाती घेतलेल्या कामांमध्ये सुयश लाभेल मन आनंदी असेल.
सगळे दिवस सारखे नसतात काही वेळेला मनाविरुद्ध घटना घडतात. आज अशा घटनांमध्ये आपल्याला आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.
अनेकांचे सहकार्य आज लागेल. कलाक्षेत्रामध्ये सुसंधी मिळणार आहे आणि त्याचे आपण सोने कराल.
कामासाठी वाट्टेल ते! असाच आपला स्वभाव आहे. महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील. आर्थिक लाभाचे प्रमाण सुद्धा समाधानकारक राहणार आहे.
पुढे होऊन आपण काम करताय ना मग आज एखादी महत्त्वाची वार्ता त्याबाबत सुवार्ता समजेल. काही जणांचा धार्मिक कार्यात सुद्धा सहभाग राहील.
खर्चाला अनेक वाटा निघतील. आरोग्याच्या तक्रारी सुद्धा जाणवतील. पण आपण तक्रार करून चालणार नाही." दटें रहो "आज परिस्थितीची दोन हात करावे लागतील.
जोडीदाराला काय हवं आहे एकमेकांनी समजून घेणे गरजेचे आहे. आज मात्र जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. दैनंदिन कामे सुद्धा मार्गी लागतील.
कर्मचारी वर्ग सहकारी यांचे उत्तम सहाय्य आपल्याला लाभेल. हितशत्रू असतील तर त्यावरही आज आपण मात कराल. चौकस पणे चौकट आखून काम कराल.
बौद्धिकदृष्ट्या आजचा दिवस चांगला आहे. बुद्धीच्या क्षेत्रात प्रगती होईल. काही जणांचे मत परिवर्तन होईल. एकूणच परिवर्तनाचा आणि शुभ वार्तांचा दिवस आहे. दत्त उपासना फलदायी ठरेल.