Saam Tv
जोडीदाराच्या तब्येतीची आज काळजी घ्यावी लागेल. मोठ्या प्रवासाचे बेत आखले जातील.
गृहसौख्यात विनाकारण अडथळे अडचणी येतील. पण गुंतवणूक आणि लाभाच्या दृष्टीने आज दिवस चांगला आहे.
बोलल्यामुळे कामे वाढतील. नव्याने बैठका होतील. समाजकारण राजकारणामध्ये मान वाढेल. वरिष्ठ व्यक्तीकडून कौतुक होईल. दिवस चांगला आहे.
प्रवासातून फायदा होईल. लांबचे प्रवास होतील. भाग्यकारक घटनांचा कालावधी आहे. शिव उपासना यासाठी सहाय्यकारी ठरेल.
सरकारी कामे आज नकोच. अडथळे येऊ शकतात. अचानक मोठ्या धनालाभाची मात्र शक्यता आहे.
भागीदाराबरोबर व्यवसाय सुखावह ठरेल. नव्या ओळखी होतील. बुद्धीने मार्ग काढावा लागेल.
तब्येतीच्या तक्रारी वाढतील. कनिष्ठ वर्गाकडून त्रास संभवतो आहे. नोकरदारांना दिवस बरा आहे. कामात मात्र दगदग वाढेल.
केलेल्या कामाचे योग्य श्रेय आणि पोचपावती आज मिळेल. सन्मान आणि प्रतिष्ठा वाढेल. ध्यान आणि उपासनेच्या मार्गातून प्रगती साधाल.
नवीन घर अथवा वाहन खरेदीसाठी आजचा दिवस तुमच्यासाठी पर्वणी घेऊन आला आहे. अशी संधी सोडू नका. कुटुंबीयांच्या सहकार्याने पुढे जाल.
व्यवसायामध्ये भाग्य वृद्धी होईल. अनेक दिवस रखडलेली कामे आज सहज मार्गी लागतील. पत्रव्यवहार सुरळीत पार पडतील.दिवस चांगला आहे.
काही गोष्टी हाताशी येताना सुटल्यासारख्या वाटतील. जुन्या आठवणींमध्ये मन रमेल.
स्वतःच्या प्रेमात रहाल. वेगळी आभा आज आपली राहील. देवधर्मामध्ये मन रमेल. सुखाला नवीन वाटा मिळतील. दिवस चांगला आहे.