Sakshi Sunil Jadhav
उष्णतेचे विकार, तब्येतीच्या तक्रारी वाढण्याची शक्यता आहे.
प्रेमामध्ये विशेष समजूतदारपणा राहील. लक्ष्मी उपासना विशेष फलदायी ठरेल. आज दुर्गाष्टमी आहे चांगले फळ मिळेल.
शेती बागायतीमध्ये रस घेऊन काम कराल. नवनवीन संकल्पना अमलात आणणार आहात.
जिद्द, चिकाटी, प्रेरणा या गोष्टीने आज आपल्या दिवसाचा अंमल घेतला आहे. याच पद्धतीने वागाल.
जसे वागाल तसे कमवाल. असा आजचा दिवस आहे. उदारता पूर्ण भाव राहतील. इतरांवर तुमचा प्रभाव राहील.
बौद्धिकता ओसंडून वाहील. आपल्या आजूबाजूच्या लोकांवर विशेष प्रभाव राहील. ठरवाल ते करावेच लागेल.
प्रेमाच्या बाबतीत थोडे वाद वाढतील. कामांमध्ये व्यस्तता, व्यग्रता असणार आहे. मनोबल डळमळीत राहील.
नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. नवीन भाषा मोठे प्रवास, जुन्या गुंतवणुकीतून फायदा होईल.
मोठ्या जबाबदाऱ्या अंगावर घ्याल. कामानिमित्त प्रवास होतील. बढतीचे योग दिसत आहे.
शिव उपासनेने सर्व सिद्ध होईल. दानधर्मामध्ये दिवस व्यतीत करावा लागेल. मनःशांतीसाठी विविध अनुष्ठान करावी लागतील.
अचानक धनलाभ, मोठा पैसा मिळण्याची शक्यता आहे. जोडीदाराकडून विशेष धनालाभाचे योग आहेत.
कामांमध्ये काही दिवस अडचणी येत आहेत. व्यवसाय, व्यापारामध्ये हवी तशी प्रगती होत नाही.