Sakshi Sunil Jadhav
आज प्रवासातून यश प्राप्ती होईल. मेहनतीचे फळ पदरी पडेल.
धन,धान्य, संपत्तीत आज वाढ होताना दिसेल. दिवस कामात जाईल.
मनाप्रमाणे घटना घडतील. विचारात सकारात्मकता येईल.
कामात अडथळे निर्माण होतील. साधेपणाचा त्याग करणे योग्य ठरेल.
प्रेमात वाद होतील. व्यवहारासाठी आज दिवस चांगला आहे.
कामात यश मिळवण्यासाठी झटपट कराल. मान, सन्मान आणि प्रतिष्ठेवर काम कराल.
मनासारख्या घटना घडतील. देवावरचा विश्वास अजून दृढ होईल. मोठे प्रवासामधून लाभ संभवत आहे.
कितीही केले तरी समोरच्याला किंमत नसते. काही वेळेला एकटेच निर्णय घेऊन शांत रहावे असे वाटते. आज तो दिवस आहे. काळजी घ्या.
जोडीदाराबरोबर देवदर्शनाला जाण्याचा योग आहे. प्रेमामध्ये वेगळे काहीतरी करून दाखवण्याची उर्मी दाटून येईल.
तब्येतीच्या तक्रारी, जुनाट आजार, कटकटी मागे लागतील. आपल्याच लोकांचे आपल्याला सहकार्य आज लाभणार नाही. दिवस संमिश्र आहे.
नवनवीन गोष्टी शिकण्याच्या मागे लागाल. संशोधनात्मक कार्यात प्रगती होईल. शेअर्समधील गुंतवणूक आज फायदेशीर ठरेल.
मातृसौख्य उत्तम मिळेल. जमिनीशी निगडित व्यवहार होतील. गुरेढोरे, शेतीवाडी याचे काही व्यवहार सहज पार पडतील.