Sakshi Sunil Jadhav
तुम्ही घेतलेला निर्णय अचूक ठरेल. प्रवास सुखकर होतील.
हाती घेतलेले काम नेटाने पुढे न्याल. त्याच्यामध्ये सुयश नक्कीच मिळणार आहे.
अचानक धनलाभाची शक्यता आहे. व्यवसाय वृद्धी दिसते आहे. कौटुंबिक स्वास्थ चांगले आहे.
तुमचे कार्यक्षेत्र वाढते राहील. मनोबल उत्तम राहील. मनासारख्या घटना घडल्यामुळे आरोग्य सुद्धा चांगले राहील.
आपल्या वस्तू, ऐवजांची काळजी घ्या. महत्त्वाच्या गोष्टी शक्यतो आज नकोतच. कामात अडथळे येतील.
संतती हा कधीकधी आपल्यासाठी चिंतेचा विषय असतो. प्रश्न मार्गी लागतील. प्रियजनांचा सहवास लाभेल.
मानसन्मान प्रतिष्ठा आज लाभण्याचा दिवस आहे. वरिष्ठ लोकांच्याकडून सहकार्य मिळेल. बढतीचे योग आहेत.
तुमच्या कर्तुत्वाला नवनव्या संधी प्राप्त होतील. आरोग्य उत्तम राहील. नेटाने काम केल्यामुळे यशाची कमान चढती राहील.
खर्चाचे प्रमाण वाढते राहील. उगाचच मानसिक चिंता अस्वस्थता जाणवेल. मनोबल उत्तम ठेवण्याचा प्रयत्न करा.
मन आनंदी आणि आशावादी राहील. जोडीदाराकडून सुद्धा योग्य सहकार्य आज मिळेल.
दैनंदिन कामांमध्ये बाधा येण्याची शक्यता आहे. विनाकारण उकरून काही गोष्टी आज काढू नका.
गुरुची कृपा असणार आहे.आपली विशेषता बौद्धिक क्षेत्रात आज प्रगती होईल. आर्थिक लाभाचे प्रमाण सुद्धा समाधानकारक राहील.