Sakshi Sunil Jadhav
प्रेमासंबधीत कोणताही निर्णय सांभाळून घ्या. करियरच्या दृष्टीने दिवस छान आहे.
कला मनोरंजन क्षेत्रात एक वेगळी भरारी घ्याल. भाग्यकारक घटना घडण्याचा आजचा दिवस आहे.
पैशाचा मोह बरा नाही. नाती गमवाल. काळजी आणि योग्य निर्णय घ्या.
कामामध्ये यश मिळेल. नवीन गोष्टी शिकाल. योग्य निर्णय घ्याल.
पाठीच्या मणक्याचा, हाडांचा आजार डोकं वर काढेल. सत्पात्री दान व्हावे.
बोलण्याने जग जिंकाल, कौतुकाची धाप मिळेल. विष्णू उपासना करावी.
मोठ्या घराचे बैठ्या घराचे योग सुंदर आहेत. घराचे योग, आज मनातील गोष्टी पूर्ण होतील. घरासाठी नव्याने खरेदी कराल.
भल्या मोठ्या जबाबदाऱ्या खांद्यावर येऊन पडणार आहेत. पण तेवढ्यात सक्षमतेने तुम्ही त्या निभावणार आहात. हे लक्षात घ्या.
जोडीदारावर आपले विशेष प्रेम आहे पण आज जाणवेल. त्याच्या तब्येतीच्या तक्रारीमुळे मन थोडेसे खट्टू होईल.
शांततेने धीम्या गतीने वाटचाल करणे ही आपल्या राशीची खासियत आहे. कोणाच्या आध्यात द न येता स्वतःसाठी आज दिवस घालवाल.
मातेकडून भाग्योदय संभवतो आहे. अवाक्या बाहेरचे खर्च आज नकोतच. महत्त्वाची कामे सुद्धा दुपारनंतर करावीत.
आपली स्वरूपात आणि मनाचे औदार्य, साधेपणा या गोष्टी आपल्या मित्र मैत्रिणी मध्ये मोलाची भर टाकतात. आयुष्य जगण्याची सुलभता वाढेल.