Sakshi Sunil Jadhav
क्रीडा क्षेत्रात प्रगती आहे. संततीचे धाडस सुद्धा कामी येईल. गणेश उपासना फलदायी ठरेल.
नव्याने खरेदी होईल. जुन्याचे नवे करण्यासाठी आज जंग बांधून कामे कराल. कुटुंबीयांचे सहकार्य उत्तम राहील.
कामामध्ये जीव ओतून काम कराल. जिद्द आणि चिकाटीने क्षितिज आपलेसे कराल.
पाहुण्यांच्या आगमनाने मन प्रसन्न राहील. विविध पदार्थ बनवण्याची आज जणू काही शर्यतच आहे अशी भावना येईल.
आत्मसन्मान बाळगून राहाल. आत्मविश्वास वाढेल. इतरांवर आपला प्रभाव राहील.
मनस्ताप टाळण्यासाठी झालेला पैसा खर्च उपयोगात येतोय ना? हेच विचार करून सोडून देणे योग्य आहे.
प्रेमासाठी काहीतरी वेगळे आपल्याला आज करावे लागेल. समोरच्याचे म्हणणे मान्य करून पुढे जावे लागेल. विविध लाभ होतील.
सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. राजकारणामध्ये मान मिळेल. केलेल्या कामाची पोचपावती मिळणार आहे.
दत्त उपासना फलदायी ठरेल. ठरवलेल्या गोष्टी तशाच घडतील. दिवस आनंदी आहे.
अचानक मोठे धन लाभ मिळण्याची शक्यता आहे. पण कष्टाला आज पर्याय नाही हे तितकेच लक्षात ठेवा.
जोडीदाराचा विचार प्रथम येईल. काम करताना एकत्रित रित्या मिळून काम कराल. व्यवसायामध्ये कामाला उधाण येईल.
पाण्यापासून सावध राहा. पोटाशी निगडित आजार होतील. मनस्थिती जपावी लागेल. नोकरीमध्ये मात्र गती आणि प्रगती दोन्ही आहे.
NEXT : ब्रेड बटर विसरा! ५ मिनिटांत करा अवोकाडो चीज टोस्ट रेसिपी