Saam Tv
नाताळ सण जोडीदाराबरोबर उत्साहाने साजरा कराल. दिवस आनंदात जाईल.
गोड बोलून नोकर चाकर यांच्याकडून कामे करून घ्यावी लागतील. इतरांची सेवा करावी लागेल.
तुमची मुलं बाळं हीच तुमची खरी संपत्ती आहे हे आज तुम्हाला कळेल.
घरी पाहुण्यांचे आगमन होईल. नवीन गाडी खरेदीचे योग आहेत.
भावंडांची जबाबदारी उचलावी लागेल. हसतमुखाने ती स्वीकाराल. पत्रव्यवहार मार्गी लागतील.
नवी गुंतवणूक करताना चार वेळा विचार करा. कोणावरही सहज विश्वास टाकून कागदपत्रांचे व्यवहार करू नका. लक्ष्मी प्रसन्न राहील.
खरेदीसाठी उत्तम वातावरण आज असेल. मन भरून जगाल. आरोग्य चांगले राहिल्यामुळे दिवस प्रसन्न राहील.
मन अनेक ठिकाणी उसळ्या घेईल. नसत्या कटकटी, मागे लागतील.
जेवढे झेपेल तेवढाच कामाचा व्याप ठेवा. नको त्या कर्मापासून पैसे मिळवण्याची वेगळी हाव आज नको.
बढतीचे, प्रमोशनचे योग आज कामाच्या ठिकाणी आहेत. कष्टाला योग्य ती दाद मिळाल्यामुळे वरिष्ठांबद्दल आपल्याला आदर निर्माण होईल.
सहज आणि सोपे असे आज आयुष्य आहे. देवाने दिलेल्या गोष्टीविषयी कृतज्ञता बाळगाल. भाग्याचे नवे दालन सहज खुले होईल.
शारीरिक मेहनत होईल. पण कामाच्या ठिकाणी केलेल्या कष्टाचा आज योग्य मोबदला आणि लाभ दोन्ही मिळेल. आपल्या सहज सरळ आणि साध्या स्वभावामुळे समोरच्याची मने जिंकून घ्याल.