मालदीव विसरा! भारतातील ही 6 हनिमून डेस्टिनेशन्स आहेत स्वर्गाहून सुंदर

Saam TV News

हा ठिकाणं एक्सप्लोर करा

लग्नानंतर जोडीदारासोबत घालवायचे आहेत रोमँटिक क्षण? मग भारतातील ही 6 सुंदर ठिकाणं तुमच्या हनिमूनसाठी ठरतील परफेक्ट

india honeymoon destinations | pinterest

लक्षद्वीप

लक्षद्वीपचे सुंदर समुद्रकिनारे, स्वच्छ निळे पाणी आणि शांत वातावरण प्रेमीयुगुलांसाठी एखाद्या स्वर्गापेक्षा कमी नाही. स्कूबा डायव्हिंग आणि स्नॉर्कलिंगचा आनंदही घेता येतो.

Lakshadweep | pinterest

गुलमर्ग

काश्मीरमधील गुलमर्ग हे रोमँटिक हनिमूनसाठी सुंदर ठिकाण आहे. बर्फाच्छादित डोंगर, हिरवीगार कुरणं आणि निसर्गरम्य वातावरण तुमच्या सहलीला अविस्मरणीय बनवेल.

Gulmarg | pinterest

अंदमान-निकोबार

अंदमानमधील सुंदर समुद्रकिनारे, निळेशार पाणी आणि शांत बेटं नवविवाहित जोडप्यांसाठी खास आहेत. हॅवलॉक बेटावरील निसर्गसौंदर्य तुमचं मन जिंकेल.

Andaman-Nicobar | pinterest

केरळ

केरळमधील आल्हाददायक वातावरण, नारळाच्या झाडांनी सजलेले किनारे हनिमूनला खास बनवू शकते.

kerala | pinterest

उदयपूर

राजस्थानमधील उदयपूरला तलावांचं शहर म्हटलं जातं. सुंदर राजवाडे, तलावातील बोटिंग आणि रोमँटिक डिनरमुळे हे ठिकाण कपल्ससाठी आकर्षण ठरतं.

udaipur | pinterest

अलेप्पी

लग्नानंतर आराम करण्यासाठी केरळ मधील अलेप्पीपेक्षा उत्तम जागा नाही. येथील नारळाची झाडे, शांत पाणी आणि पारंपरिक दक्षिण भारतीय खाद्यपदार्थ, निसर्गरम्य हाऊसबोट, सूर्यास्त आणि रोमँटिक वातावरणासाठी अलेप्पी उत्तम ठिकाण आहे.

Alleppey | pinterest

कोणतं ठिकाण परफेक्ट?

परदेशात न जाता भारतील या रोमँटिक ठिकाणांवर तुमच्या जोडीदारासोबत एखादं ठिकाण निवडा आणि आयुष्यभर लक्षात राहील असा हनिमून प्लॅन करा

india honeymoon destinations | pinterest

NEXT : मुंबईची हटके सफर, प्राचीन गुहा आणि शांत निसर्गाच्या सानिध्यात लपलेली ही आहेत सुंदर 8 ठिकाणे

best hidden nature spots and ancient caves in mumbai | SAAM TV
येथे क्लिक करा