Dhanshri Shintre
जुलैमध्ये दुचाकी विक्रीत सुधारणा झाली असून, अनेक वाहन उत्पादकांनी या काळात चांगली विक्री केली आहे.
विक्रीत फेरबदल झाला असून, होंडाने हिरो मोटोकॉर्पला मागे टाकून जगातील सर्वोच्च दुचाकी कंपनी ठरली आहे.
टीव्हीएस मोटर्स आणि रॉयल एनफील्डनेही जुलैमध्ये विक्रीत वाढ दर्शवली आहे, तर पाहूया वाहन विक्रीचे आकडे.
रॉयल एनफील्डने जुलैमध्ये ७६,२५४ युनिट्स विकल्या, गेल्या वर्षीच्या तुलनेत २४.६% वाढ नोंदवली आहे.
सुझुकीने पाचव्या स्थानी ९६,०२९ युनिट्स विकल्या, गेल्या वर्षीच्या तुलनेत ४.५% विक्री कमी झाली आहे.
बजाज ऑटोने जुलैमध्ये १,३९,२७९ दुचाकी विकल्या, गेल्या वर्षीच्या तुलनेत १७.५% विक्रीत घट झाली आहे.
टीव्हीएस मोटर्स तिसऱ्या क्रमांकावर असून, जुलैमध्ये ३,०८,७२० युनिट्स विकल्या, २१.४% वाढ नोंदवली आहे.
हिरो दुसऱ्या स्थानी घसरली असून, जुलैमध्ये ४,१२,३९७ युनिट्स विकल्या, १८.७% वाढ नोंदवली आहे.
होंडाने जुलैमध्ये ४,६६,३३१ युनिट्स विकून नंबर १ स्थान पटकावले, ६.२% विक्री वाढ नोंदवली आहे.