Dhanshri Shintre
दैनंदिन कामांपासून प्रवासापर्यंत बाईकचा वापर अनेकजण करतात, कारण ती सोयीस्कर आणि उपयुक्त आहे.
बाईक दीर्घकाळ उत्तम चालण्यासाठी वेळोवेळी तिची सर्व्हिसिंग करणे गरजेचे असून, अनेकजण हे पाळतात.
ठराविक अंतर चालवल्यानंतर बाईकची सर्व्हिसिंग आवश्यक असते, मात्र व्यस्त दिनचर्या किंवा खर्च टाळण्यासाठी अनेकजण ती वेळेवर करत नाहीत.
वेळेवर बाईकची सर्व्हिसिंग न केल्यास मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते. उशिरा सर्व्हिसिंग केल्याचे गंभीर तोटे कोणते ते जाणून घ्या.
सर्व्हिसिंग न केल्यास इंजिनला सर्वाधिक त्रास होतो, कारण इंजिन ऑइल वेळेवर बदलणे आवश्यक असते.
उशिरा सर्व्हिसिंग केल्यामुळे बाईकचे पार्ट्स खराब होतात, इंजिनवर ताण येतो आणि त्यामुळे मायलेज घटते, जास्त इंधनाचा वापर होतो.
बाईक सर्व्हिसिंगदरम्यान ब्रेक, टायर, चेन तपासली जाते. उशिरा सर्व्हिसिंग केल्यास ब्रेक पॅड खराब होतात, टायर्सची पकड व चेन सैल होते.
बाईक वेळेवर सर्व्हिस न केल्यास कामगिरीवर परिणाम होतो, विचित्र आवाज येतात, गीअर बदलताना अडचण येते आणि पिकअपही कमी होतो.
वेळेवर बाईकची सर्व्हिसिंग न केल्यास छोट्या समस्या मोठ्या खर्चाचे कारण बनतात, त्यामुळे वेळेवर सर्व्हिसिंग करून मोठे नुकसान टाळता येते.