Dhanshri Shintre
होंडाने भारतीय बाजारात नुकतीच CB125 Hornet आणि Shine 100 DX बाईक लाँच केल्या असून किंमत जाहीर केली आहे.
होंडाने CB125 Hornet ची एक्स-शोरूम किंमत 1.21 लाख आणि Shine 100 DX ची सुरुवातीची किंमत 74,959 रुपये जाहीर केली आहे.
या दोन्ही बाईकची डिलिव्हरी 15 ऑगस्ट 2025 नंतर सुरू होईल. बुकिंग होंडाच्या अधिकृत वेबसाईट किंवा डिलरशिपवर करता येईल.
बाईकमध्ये पूर्ण एलईडी लाइटिंग आणि 4.2 इंचाचा टीएफटी डिस्प्ले आहे, ज्यात टूथ होंडा रोडसिंक, टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन, कॉल आणि एसएमएस अलर्ट सुविधा दिल्या आहेत.
शार्प आणि मस्कुलर डिझाइनसह इंधन टाकी आणि आकर्षक रंग तरुणांच्या आकर्षणाचे केंद्र आहेत, तर सोनेरी युएसडी फ्रंट फोर्क्स गाडीला खास लूक देतात.
गाडीत 5 स्टेप अॅडजस्टेबल मोनो-शॉक रियर सस्पेंशन दिले आहे, जे खड्डे असलेल्या रस्त्यावर आरामदायक आणि स्थिर राइड सुनिश्चित करते.
CB125 Hornet मध्ये 123.94 सीसी सिंगल-सिलेंडर, फ्युएल इंजेक्टेड OBD2 इंजिन आहे, जे 7500 RPM वर 8.2 kW आणि 6000 RPM वर 11.2 Nm टॉर्क देते.