ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
होंडा कार्स इंडियाने त्यांची कॉम्पॅक्ट सेडान, तिसऱ्या जनरेशनची होंडा अमेझ, क्रिस्टल ब्लॅक पर्ल रंगात लाँच केली आहे, ज्यामुळे तिला एक नवीन आणि प्रीमियम लुक मिळाला आहे.
कंपनीच्यामते, तरुण आणि स्टायलिश ग्राहकांमध्ये ब्लॅक कलर खूप आवडता आहे.हा नवीन कलर अमेझ कारचं आकर्षण आणि स्पोर्टी लुक आणखी वाढवतो.
या सेडानमध्ये 1.2-लिटर, 4-सिलेंडर पेट्रोल इंजिन आहे जे 90bhp आणि 110Nm टॉर्क निर्माण करते.
ही कार 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आणि सीव्हीटी ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह उपलब्ध आहे.
या कारमध्ये 5 स्पीड मॅन्युअल व्हेरिएंट 18.65 किमी\लिटर आणि CVT व्हेरिएंट 19.46 किमी\लिटर पर्यंत मायलेज देते.
तिसऱ्या जनरेशन मधील Amaze चे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे भारतातील सर्वात स्वस्त कार आहे ज्यामध्ये लेव्हल-२ अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टम (ADAS) आहे.
Honda Amaze ची सुरुवातीची (एक्स-शोरूम) किंमत ₹८.०९ लाख आहे.तर क्रिस्टल ब्लॅक रंगातील 'V' बेस मॉडेलची किंमत ₹८.१८ लाख (एक्स-शोरूम) ठेवण्यात आली आहे.