Dhanshri Shintre
भारतात बाईक्सच्या तुलनेत स्कूटर अधिक लोकप्रिय आहेत. स्कूटरला ग्राहक त्यांना रोजच्या वापरासाठी अधिक पसंती देतात.
स्कूटर चालवणे बाईकपेक्षा अधिक सोपे आणि सोयीस्कर असल्यामुळे अनेक भारतीय वापरकर्ते स्कूटरला प्राधान्य देतात.
भारतात स्कूटरची चर्चा झाली की सर्वप्रथम लोकांच्या मनात येणारे सर्वात लोकप्रिय मॉडेल म्हणजे होंडा ॲक्टिव्हा असते.
अलीकडेच होंडा कंपनीने ॲक्टिव्हा स्कूटरची ३.५ कोटी युनिट्स विक्रीचा मोठा टप्पा पार केल्याची घोषणा केली.
होंडा ॲक्टिव्हा प्रथमच २००१ साली भारतीय बाजारात सादर करण्यात आली आणि तेव्हापासून ती लोकप्रिय ठरली आहे.
२०१५ पर्यंत होंडाने ॲक्टिव्हाच्या १ कोटी युनिट्सची विक्री पार केली आणि त्याच वर्षी हा आकडा 2 कोटींवर पोहोचला.
काळानुसार होंडाने ॲक्टिव्हाचे विविध मॉडेल्स सादर केले, ज्यात Activa 110, Activa 125 आणि इलेक्ट्रिक ई-ॲक्टिव्हाचा समावेश आहे.