ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
चटपटीत चिवडा हा एक लोकप्रिय स्नॅक्स आहे. हा चिवडा पातळ पोह्यांपासून बनवला जातो. चहासोबत चिवडा खाण्यास अतिशय टेस्टी लागतो.
चिवडा बनवण्यासाठी पोहे, शेंगदाणे, कढीपत्ता, मोहरी, हळद, मीठ, साखर आणि तेल इत्यादी गोष्टी लागतात.
पोहे हलकेसे भाजून घ्या आणि बाजूला ठेवून द्या. मग शेंगदाणे देखील परतवून घ्या.
आता तेल गरम करत ठेवा त्यात मोहरी टाका. कढीपत्ता, हळद आणि मीठ मिक्स करुन घ्या.
भाजून घेतलेले पोहे आणि शेंगदाण्यांना तयार केलेल्या तडक्यात मिक्स करा. चिवड्यात तुम्ही ड्राय फ्रुट्स देखील मिक्स करु शकता.
आता तयार केलेल्या सगळ्या चिवड्याच्या मिश्रणात साखर टाका आणि सगळे मिश्रण एक सारखे ढवळून घ्या जेणेकरुन मसाले मिक्स होतील.
चिवडा थंड होऊ द्या थंड झाल्यानंतर हवाबंद डब्यात ठेवा. चहासोबत किंवा संध्याकाळच्या नाश्त्यात चिवड्याचा आस्वाद घ्या.