ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
किचनमधील एक महत्त्वाचा पदार्थ असलेला चाट मसाला हा एक मसालेदार आणि तिखट मानला जातो. जो सॅलड, फळे आणि सॅक्समध्ये वापरला जातो.
चाट मसाला बनविण्यासाठी आमचूर, जिरे, काळी मिरी, काळे मीठ, हिंग, साधे मीठ, सेलेरी आणि गरम मसाला इत्यादी साहित्य लागते.
जिरे, काळी मिरी आणि सेलेरी हलक्या हाताने भाजून घ्या. भाजून झाल्यानंतर बारिक करुन घ्या.
भाजलेल्या मसाल्यांमध्ये आमचूर पावडर, काळे मीठ, हिंग आणि गरम मसाला मिक्स करुन घ्या.
तयार केलेल्या मिश्रणात तुमच्या चवीनुसार मीठ घाला आणि चांगले मिक्स करुन घ्या.
सगळे साहित्य मिक्स करुन झाल्यानंतर मिश्रण बारिक वाटून एकसमान करा आणि पावडर बनवून घ्या.
तयार केलेला चाट मसाला ताजा राहण्यासाठी हवाबंद डब्यात ठेवून द्या.
चाट, पकोडे, फळे आणि सॅलड यावर मसाला टाका आणि खाण्याचा आनंद घ्या.