Homemade Rose Water: हिवाळ्यात ताज्या गुलाबांपासून घरीच बनवा गुलाबजल; तुमच्या त्वचेला मिळेल नॅचरल ग्लो आणि सॉफ्टनेस

Shruti Vilas Kadam

साहित्याची तयारी

घरचे शुद्ध गुलाब जल तयार करण्यासाठी ताज्या गुलाबाच्या पंखुड्या (सुमारे १ कप) आणि स्वच्छ पाणी (२ कप) एवढेच साहित्य लागते.

Homemade Rose Water

पाकळ्या स्वच्छ धुवा

गुलाबाच्या पाकळ्यांवर धूळ किंवा कीटकनाशकांचे अंश असू शकतात. त्यामुळे त्या कोमट पाण्यात हलक्या हाताने नीट धुऊन घ्याव्यात.

Homemade Rose Water

उकळण्याची प्रक्रिया

एका पातेल्यात पाणी गरम करा. त्यात स्वच्छ पाकळ्या टाका आणि मंद आंचेवरच उकळू द्या. पाणी जोरात उकळू नये, याची काळजी घ्या.

Homemade Rose Water

रंग बदलण्याची वाट पाहा

पाकळ्यांचा रंग फिका होईपर्यंत आणि पाणी सुंदर गुलाबी दिसू लागेपर्यंत त्याला शांतपणे शिजू द्या. यामुळे गुलाबाचा सुगंध आणि गुणधर्म पाण्यात उतरतात.

Homemade Rose Water

गाळून घ्या

गॅस बंद करून मिश्रण थंड होऊ द्या. नंतर मलमलच्या कपड्याने किंवा बारीक गाळणीने गाळून पाकळ्या वेगळ्या करा.

Homemade Rose Water

थंड करून साठवा

गुलाब जल पूर्णपणे थंड झाल्यावर ते स्वच्छ काचेच्या बाटलीत किंवा स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवा.

Homemade Rose Water

सुरक्षित वापर


घरचे गुलाब जल फ्रिजमध्ये ठेवल्यास ते १० ते १५ दिवस आरामात टिकते. रोजच्या स्किनकेअरसाठी सुरक्षितपणे वापरता येते.

Homemade Rose Water

हिवाळ्यात रोज ३ खजूर खल्ल्याने होतील 'हे' आरोग्यदायी फायदे

khajur Benefit
येथे क्लिक करा