Alisha Khedekar
मैद्याऐवजी दूध वापरल्याने पास्त्याला छान क्रीमी टेक्स्चर मिळते आणि चवही हलकी, मऊ व स्वादिष्ट लागते.
थोडे किसलेले चीज घातल्याने सॉस घट्ट होतो आणि मैदा न वापरताही पास्त्याला मस्त क्रीमीपणा मिळतो.
भिजवलेल्या काजूंची बारीक पेस्ट सॉसमध्ये मिसळा. यामुळे पास्ता नैसर्गिकरित्या घट्ट, क्रीमी आणि रिच लागतो.
थोडे कॉर्नफ्लोअर पाण्यात विरघळून सॉसमध्ये घाला. काही मिनिटांत सॉस घट्ट होऊन छान क्रीमी बनेल.
पास्ता उकडलेले थोडे पाणी फेकू नका. त्यातील स्टार्च सॉसला बांधून ठेवतो आणि क्रीमी टेक्स्चर मिळवून देतो.
सॉस नेहमी मंद आचेवर शिजवा. त्यामुळे दूध किंवा चीज फाटत नाही आणि सॉस एकसारखा क्रीमी राहतो.
सदर माहिती सामान्य ज्ञानावर असून योग्य माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा