Shreya Maskar
दुकानातील महागडे प्रोटीन बार खाण्यापेक्षा घरीच सिंपल पद्धतीने प्रोटीन बार बनवा. लहान मुलांना देखील हा पदार्थ खूप आवडेल.
प्रोटीन बार बनवण्यासाठी खजूर, भोपळ्याच्या बिया, ड्रायफ्रूट्स, तीळ, खोबऱ्याचा कीस, मध, वेलची पावडर, ओट्स, मीठ इत्यादी साहित्य लागते.
प्रोटीन बार बनवण्यासाठी कोमट पाण्यात बिया काढून काळा खजूर भिजवावा. त्यानंतर मिक्सरला चांगली पेस्ट बनवा.
पॅनमध्ये ड्रायफ्रूट्स, भोपळ्याच्या बिया मंद आचेवर गरम करा. यात खोबऱ्याचा किस घालून पुन्हा चांगले भाजून घ्या.
दुसऱ्या पॅनमध्ये खजूराची पेस्ट, भाजलेले ड्रायफ्रूट, भोपळ्याच्या बिया, मध आणि वेलची पूड घालून सर्व एकजीव करा.
यात मीठ, भाजलेल्या ओट्सची पावडर मिक्स करून त्याचा घट्ट गोळा करा. ओट्समध्ये भरपूर पोषक घटक असतात.
एका ताटाला बटर लावून सर्व मिश्रण पसरवून घ्या. २-३ तास हे मिश्रण सेट होण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवून द्या.
आता तयार मिश्रणाच्या वड्या पाडून प्रोटीन बारचा आस्वाद घ्या. तुम्ही यात आवडीनुसार दाणे, चॉकलेट, खारीक पावडर घालू शकतो.