ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
चटपटीत खायला सर्वांनाच आवडते मात्र लहान मुलांना बाहेरचे चटपटीत पिझ्झा, बर्गर हे पदार्थ खायला देणे टाळले जाते.
यासाठी आज आम्ही घरच्या घरी सोप्या पद्धतीनं पिझ्झा बनवण्याची ट्रीक सांगणार आहोत.
घरी पिझ्झा बनवण्यासाठी तुम्हाला रवा, दही, मीठ, मीरीपूड, पिझ्झा ब्रेड, कांदा, पनीर, शिमला मिरची, बटर, चीज हे साहित्य तयार ठेवायचे आहे.
सर्वप्रथम रवा आणि दही एकत्र मिक्स करून त्यात पाणी घाला. यानंतर मिश्रणात मीठ आणि मिरीपूड घालून एकजीव करा.
गॅसवर पॅनमध्ये बटर लावा तयार मिश्रण जाडसर पसरवून दोन्ही बांजूनी चांगले परतून घ्या.
यानंतर पिझ्झा ब्रेडला चीज लावून त्यावर बारीक चिरलेला कांदा, शिमला, टोमॅटो आणि पनीर घाला.
यावर पिझ्झा शिजवून घेतल्यानंतर त्यावर ओरीगॅनो आणि चिली प्लेक्स घालून सर्व्ह करा.