Siddhi Hande
रोज जेवताना तोंडी लावण्यासाठी चटणी ही लागतेच.
झणझणीत चटणी खाल्यावर जेवणाची चव अजूनच वाढते.
तुम्ही घरी ५ मिनिटांत शेंगदाण्याची चटणी बनवू शकतात.
शेंगदाण्याची चटणी बनवण्यासाठी सर्वप्रथम जीरे मंद आचेवर भाजून घ्या.
त्यानंतर त्यात लसणाच्या पाकळ्या टाका. त्याचसोबत शेंगदाणे टाका.
हे हलकं भाजून झाल्यार त्यावर तिखट, मीठ घालून चांगलं मिक्स करा. तुम्ही यावर तेलदेखील टाकू शकतात.
त्यानंतर हे सर्व मिश्रण खलबत्त्यात किंवा मिक्सरमध्ये कुटून घ्या.
यानंतर तुम्ही ही चटणी जेवणासोबत खाऊ शकता.