Sakshi Sunil Jadhav
पावसाळ्यात घराच्या फरशीवर (floor) सतत ओलावा राहतो आणि घाण, बुरशी किंवा चिखल जमा होण्याची शक्यता वाढते.
पावसाळ्यात फरशी स्वच्छ ठेवण्यासाठी घरगुती लिक्विड क्लीनर वापरणं योग्य ठरतं.
पाणी १ लिटर, सफेद व्हिनेगर, लिंबाचा रस, बेकिंग सोडा, टी ट्री ऑइल किंवा निंबोळी तेल, लिक्विड साबण किंवा लिक्विड डिटर्जंट इ.
तुम्ही हे सगळे साहित्य एका बादलीत तयार करू शकता.
लिक्विड करताना साहित्याचे प्रमाण म्हणजेच पाणी १ लीटर, दीड कप व्हिनेगर व बाकीचे साहित्य १ ते २ चमचे इतके असावे.
तयार पाण्यामध्ये फडकं भिजवून फुरशी पुसा.
रोज हे लिक्विड वापरल्यास फरशीवरील जंतू नाहीसे होतील.
घरगुती लिक्वीड हे रासायनिक पदार्थांपासून मुक्त असते.
तुम्ही अशाप्रकारचे लिक्वीड वापरल्यास गंध दूर होतो आणि नैसर्गिक सुंगध पसरतो.