Moong Dal Soup: बाहेरचं खाणं कशाला? घरच्या घरी बनवा चटपटीत आणि गरमागरम मुग डाळीचे सूप, वाचा सोपी रेसिपी

Dhanshri Shintre

साहित्य

आले, लसूण पाकळ्या, टोमॅटो, गाजर, भोपळ्याचा तुकडा, पालक, सांबार पावडर, पाणी, तेल, लिंबू, काळीमिरी, मिरची, कोथिंबीर, मूग.

कृती

१ कप मूग किंवा हरभरा डाळ धुऊन गरम पाण्यात भिजवा. नंतर निथळून, ४-५ दिवस फ्रीजमध्ये ठेवून वापरासाठी साठवा.

लसूण परतून घ्या

एका भांड्यात १ टेबलस्पून तेल किंवा तूप गरम करून त्यात आले आणि लसूण घालून १-२ मिनिटे हलके परतून घ्या.

भाज्या घाला

टोमॅटो आणि इतर भाज्या घालून २-३ मिनिटे परतवा, नंतर सांबार किंवा करी पावडर आणि अर्धा चमचा मीठ टाकून मिक्स करा.

मूग घाला

भिजवलेले मूग निथळून भांड्यात घाला. त्यात ४ कप पाणी टाका. उकळी आणून झाकण ठेवून मध्यम आचेवर मऊ होईपर्यंत शिजवा.

पालेभाज्या

एका कढईत एक चमचा तूप, तेल किंवा बटर गरम करून त्यात चिरलेल्या पालेभाज्या टाका आणि थोडे परतून घ्या.

नीट ढवळा

सूपमध्ये परतलेले हिरव्या भाज्या मिसळा, नीट ढवळा. चवीनुसार मीठ, आणि अधिक चवेसाठी थोडी काळी मिरी किंवा मिरचीचे तुकडे घाला.

सर्व्ह करा

लिंबाचा रस घालून शेवटी सूपला ताजेपणा द्या. हवे असल्यास कोथिंबीरची पानं पसरवून सूप सजवा आणि गरमागरम सर्व्ह करा.

NEXT: मोड आलेल्या कुळीथाची उसळ कशी बनवावी? जाणून घ्या झटपट सोपी रेसिपी

येथे क्लिक करा