Bharat Jadhav
जेव्हा तुम्ही मसाला चहा घरी बनवाल तेव्हा त्याचा सुगंध अख्खा गल्लीत दरवळेल. चहाचा स्वाद घेतल्यानंतर तुमच्या कुटुंबातील सदस्यच नाही तर तुमचे शेजारीही परत परत चहा मागतील.
चहा बनवण्यासाठी आपण आले, हिरवी वेलची आणि लवंगचा वापर करत असतो. पण हा मसाला पावडर आणखी खास आहे कारण तो अनेक मसाल्यांच्या मिश्रणाने बनवली जाते.
दोन ते तीन दालचिनीच्या काड्या, चार ते पाच मोठ्या काळ्या वेलची, १३-१५ हिरव्या वेलची, एक चमचा काळी मिरी, एक ते दीड चमचा लवंगा, दोन चमचा बडीशेप, एक चक्रफूल, दोन ते तीन गुलाबाच्या पाकळ्या , जायफळचे छोटे तुकडे.
गुलाबाच्या पाकळ्या वगळता सर्व मसाले एका पॅनमध्ये कोरडे होईपर्यंत भाजून घ्या. ओलावा निघून गेला की, त्यांना थोडे थंड होऊ द्या. नंतर, मसाल्यांमध्ये गुलाबाच्या पाकळ्या घाला. त्यामुळे पाकळ्या देखील वाळतील होतील.

ही चहा तुमच्या घशातील खरखवर कमी करेल. मधुमेह असलेल्या लोकांसाठी देखील ही पावडर टाकून चहा पिऊ शकतात.
येथे क्लिक करा