Makeup Remover: गरबा खेळून आल्यावर 'या' सोप्या पद्धतीने करा मेकअप रिमूव्ह; कधीच होणार नाही पिंपल्स आणि डागांचा त्रास

Shruti Vilas Kadam

खोबरेल तेल

खोबरेल तेलामुळे चेहऱ्यावरील मेकअप आणि प्रदूषणाचा थर काढण्यास मदत करतो. थोडे तेल बोटांनी चेहऱ्यावर हलक्या हाताने लावा आणि मऊ कापडाने पुसून घ्या. त्यानंतर सौम्य फेसवॉशने चेहरा स्वच्छ करा.

Homemade Makeup Remover | Saam Tv

ऑलिव्ह ऑइल

ऑलिव्ह ऑइलचा वापर प्रकारचा मेकअप काढण्यासाठी करता येतो. थोडे तेल कॉटन पॅडवर घेऊन चेहऱ्यावरील मेकअप हलक्या हाताने पुसा. त्यानंतर त्वचेवर तेलाचा थर राहू नये म्हणून सौम्य क्लिन्झर वापरा.

Homemade Makeup Remover

जोजोबा ऑइल

जोजोबा ऑइलचा वापर मेकअप काढण्यासाठी करता येतो. थोडे तेल चेहऱ्यावर लावून हलक्या हाताने मसाज करा आणि मऊ कापडाने पुसून टाका.

Homemade Makeup Remover

कोल्ड क्रीम

कोल्ड क्रीम हा मेकअप काढण्यासाठी वापरला जाणारा एक सोपा पर्याय आहे. चेहऱ्यावर थोडी क्रीम लावून मेकअप हलक्या हाताने पुसा. त्यानंतर त्वचेला अनुकूल असलेल्या फेसवॉशने चेहरा धुवा.सुगंध नसलेले मॉइश्चरायझर

Homemade Makeup Remover

सुगंध नसलेले मॉइश्चरायझर

हलका, सुगंधविरहित मॉइश्चरायझर चेहऱ्यावरील काही मेकअप सैल करण्यास मदत करू शकतो. तो चेहऱ्यावर लावून मऊ कापडाने पुसा आणि नंतर चेहरा स्वच्छ करा. जड किंवा वॉटरप्रूफ मेकअपसाठी हा पर्याय पुरेसा ठरेलच असे नाही.

Homemade Makeup Remover

कोरफड जेल आणि गुलाब पाणी

कोरफड जेल आणि गुलाब पाणी वापरून त्वचेला ताजेतवाने ठेवता येते. मात्र, हे मिश्रण मेकअप रिमूव्हर म्हणूनही उत्तम आहे.

Makeup Removing Tips | Yandex

कोमट पाण्याचा मऊ कपडा

हलका मेकअप काढण्यासाठी स्वच्छ, मऊ कपडा कोमट पाण्यात भिजवून पिळून घ्या आणि चेहऱ्यावर हलक्या हाताने फिरवा. त्वचा जोरात घासू नका.

Homemade Makeup Remover

Garba Special Hairstyle: नवरात्रीत ट्रेडिशनल आऊटफिटवर करा ‘या’ ७ हेअरस्टाईल; गरबा लुक दिसेल सुंदर

Garba Special Hairstyle | Saam Tv
येथे क्लिक करा