Garba Special Hairstyle: नवरात्रीत ट्रेडिशनल आऊटफिटवर करा 'या' ७ हेअरस्टाईल; गरबा लुक दिसेल सुंदर

Shruti Vilas Kadam

सॉफ्ट कर्ल्स हेअरस्टाईल

नवरात्रीत केस मोकळे ठेवायला आवडत असतील, तर सॉफ्ट कर्ल्स हा उत्तम पर्याय आहे. घागरा-चोली किंवा अनारकली ड्रेसवर ही हेअरस्टाईल सुंदर दिसते.

Garba Special Hairstyle

फुलांची वेणी

पारंपरिक लुकसाठी फुलांची वेणी नक्की ट्राय करा. लांब केसांची वेणी घालून त्यामध्ये मोगरा किंवा गुलाबाची छोटी फुले लावा. साडी आणि घागऱ्यासोबत ही हेअरस्टाईल आकर्षक दिसते.

Garba Special Hairstyle

मेसी बन हेअरस्टाईल

गरबा खेळताना केस वारंवार चेहऱ्यावर येऊ नयेत, असे वाटत असेल तर मेसी बन बेस्ट पर्याय आहे. केसांचा सैल अंबाडा बांधून पुढील बाजूला काही बटा मोकळ्या ठेवा. गजरा लावल्यास लुक अधिक सुंदर दिसेल.

Garba Special Hairstyle

हाफ अप हाफ डाउन

केस मोकळे ठेवायचे असतील, पण त्यांना स्टायलिश लुकही द्यायचा असेल, तर हाफ अप हाफ डाउन हेअरस्टाईल करा. केसांचा वरचा भाग क्लिप किंवा छोट्या वेणीने बांधा आणि बाकी केस मोकळे सोडा.

Garba Special Hairstyle

तीन पदरी वेणी

लांब केस असणाऱ्या मुलींसाठी तीन पदरी वेणी हा सुंदर पर्याय आहे. वेणीमध्ये रंगीत रिबन, मोत्यांच्या अॅक्सेसरीज किंवा छोटी फुले लावून लुक स्टायलिश बनवा. गुजराती चनिया चोलीसोबत ही स्टाईल छान दिसते.

Garba Special Hairstyle

साइड ब्रेड हेअरस्टाईल

ट्रेडिशनल ड्रेसवर मॉडर्न टच हवा असेल, तर साइड ब्रेड करा. केसांची एका बाजूला वेणी घाला आणि काही बटा मोकळ्या ठेवा. गरबा किंवा दांडिया खेळताना ही हेअरस्टाईल सांभाळणेही सोपे जाते.

Garba Special Hairstyle

लो बन विथ गजरा

साडी, पैठणी किंवा भरजरी अनारकली ड्रेसवर लो बन हेअरस्टाईल उठून दिसते. मानेजवळ केसांचा नीट अंबाडा बांधा आणि त्याभोवती मोगऱ्याचा गजरा माळा. कानात मोठे झुमके आणि टिकलीसोबत तुमचा लूक सुंदर दिसेल.

Garba Special Hairstyle

Salad Benefits: वजन कमी करायचं आहे? मग रोज जेवताना खा सॅलड, मिळतील हे ७ आरोग्यदायी फायदे

Salad Benefits | Saam Tv
येथे क्लिक करा