Alisha Khedekar
पनीरमध्ये भरपूर प्रोटीन असल्याने स्नायूंची वाढ आणि रिकव्हरीसाठी हा नाश्ता उत्तम पर्याय ठरतो.
पॅनला बटर लावून त्यावर पनीर गोलाकार किसून टाका आणि २ मिनिटांसाठी शिजवण्यासाठी ठेवून द्या.
लसूण, कोथिंबीर आणि आलं घालून हिरवी चटणी वाटून ती पॅनवरील पनीरला लावा
शिमला मिरची, काकडी, टोमॅटो, बिट टाका आणि वरून मीठ चिमूठभर टाका.
भाज्यांवर मॅगी मसाला सारखे चव देणारे मसाले टाका. जास्त मसाले टाळा.
पनीरचा गोलाकार चपाती सारखा झालेला आकार फ्रँकीसारखा दुमडा आणि दोन्ही साईडने परतवून घ्या.
ऑफिस, कॉलेज किंवा जिमनंतर खाण्यासाठी हा रॅप सहज पॅक करता येतो.