ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
खजूर आईसक्रीम हि एक टेस्टी आणि आरेग्यदायी डिश आहे. हे आईसक्रीम तुम्ही घरीसुध्दा सोप्या पध्दतीने बनवू शकता. जाणून घ्या रेसिपी
खजूर आईसक्रीम बनवण्यासाठी ताजे खजूर, दूध किंवा नारळाचे दूध, क्रीम, साखर आणि व्हॅनीली एसेंस इत्यादी साहित्य लागते.
खजूरात गोडपणा असल्यामुळे साखरेची गरज कमी लागते. ज्यामुळे आईसक्रीमसुध्दा जास्त गोड होत नाही. ज्यांना मधुमेह आहे ते लोक पण हे आईसक्रीम खावू शकतात.
खजूर स्वच्छ धुवून घ्या. धुतल्यानंतर काही तास खजूर दुधात भिजत ठेवा, म्हणजे ते मऊ होण्यास मदत होईल.
भिजलेल्या खजूरांना मिक्सरमध्ये बारीक करुन घ्या. बारीक केल्यानंतर त्यात थोडे दूध, व्हॅनीली एसेंस आणि क्रीम मिक्स करा. नंतर फ्रीजमध्ये ठेवून द्या.
जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही मिश्रणात ड्रायफ्रुट, नट्स , चॉकलेट्स चिप्स आणि खजूराचे तुकडेसुध्दा मिक्स करु शकता. ज्यामुळे चव छान लागते.
आता तुमचे आईसक्रीम तयार आहे. फ्रिजमधून काढून तुम्ही ते चॉकलेट सिरपसोबत तुम्ही सर्व्ह करु शकता.