ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
पेरुचा रायता बनवण्यासाठी पेरु, दही, मीठ, काळी मिरी, जीरा पावडर, कोथिंबीर आणि मध किंवा साखर इत्यादी साहित्य लागते.
सर्वात आधी पिकलेला पेरु स्वच्छ धुवून घ्या. धुतल्यानंतर पेरुचे छोटे तुकडे करुन कापून घ्या.
आता एका भांड्यात ताजे जाड दही घ्या आणि त्याला चांगले फेटून पातळ करा.
दह्यात कापलेले पेरु टाका आणि चवीनुसार मीठ आणि हलकी काळी मिरी मिक्स करा.
आता मिश्रणात जीरे पावडर आणि बारीक कापलेली कोथिंबीर टाका आणि चांगले मिक्स करुन घ्या.
चव वाढवण्यासाठी तुम्ही रायतामध्ये थोडी साखर किंवा मध टाकू शकता.
हा रायता तुम्ही जेवणासोबत किंवा नुसता वाटीभर सुध्दा खाऊ शकता.
पेरु रायता पचन सुधारण्यास आणि पोट हलके ठेवण्यास मदत करते.