ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
नॅचरल ग्लो मिळविण्यासाठी, केमिकल प्रोडक्टसपेक्षा, घरगुती उपाय जास्त सुरक्षित मानले जातात.
सफरचंदापासून बनलेला फेस पॅक त्वचेला पोषण देतात आणि चेहऱ्याचा रंग सुधारण्यास मदत करतो.
सफरचंदात असलेले व्हिटॅमिन सी त्वचेची दुरुस्ती करते आणि निस्तेजपणा कमी करण्यास मदत करते.
सफरचंद किसून घ्या त्यात थोडे मध मिक्स केल्याने फेस पॅक अधिक प्रभावी होतो.
हा फेसपॅक त्वचेला आतून मॉइश्चरायझ करतो आणि कोरडेपणाची समस्या कमी करतो.
सफरचंदाचा फेसपॅक लावल्याने त्वचेचा रंग हळूहळू सुधारण्यास मदत होते.
फेसपॅक चेहऱ्यावर १५ मिनिटे लावावा. नंतर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्या. हा पॅक तेलकट आणि कोरड्या त्वचेसाठी फायदेशीर मानला जातो.
या फेसपॅकचा नियमित वापर केल्याने त्वचा मऊ आणि हेल्दी दिसू लागते.
घरगुती कोणतेही प्रोडक्ट चेहऱ्यावर लावताना सर्वात आधी त्याची पॅच टेस्ट करा. कारण आपली त्वचा खूप संवेदनशील असते.