Shreya Maskar
फ्रेंच फ्राईज बनवण्यासाठी बटाटे, मीठ, चाट मसाला, तेल,टोमॅटो सॉस आणि चिली फ्लेक्स इत्यादी साहित्य लागते.
फ्रेंच फ्राईज बनवण्यासाठी सर्वप्रथम बटाट्याची सालं सोलून लांब काप करून घ्या.
आता गॅसवर पाणी गरम करायला ठेवा आणि त्यात बटाटे उकडवा.
पाणी छान उकळल्यावर त्यात मीठ टाका आणि मिक्स करून घ्या.
थोड्या वेळाने बटाट्याचे काप कापडावर ठेवून छान वाळवून घ्या.
दुसरीकडे पॅनमध्ये तेल गरम करून त्यात बटाट्याचे काप छान तळून घ्या.
गोल्डन फ्राय झाल्यावर पेपरवर काढून त्यात वरून चिली फ्लेक्स घाला.
चटपटीत फ्रेंच फ्राईज टोमॅटो सॉससोबत खा.