Homemade Facepack For Oily Skin: उन्हाळ्यात त्वचा तेलकट आणि चिकट होतेय? हा घरगुती फेसपॅक लावा, त्वचा होईल मऊ आणि टवटवीत

Manasvi Choudhary

त्वचेची काळजी

उन्हाळ्यात त्वचेची योग्य प्रकारे काळजी घेतली जाते. उन्हाळ्यात त्वचा तेलकट आणि चिकट होते यासाठी नेमकी काय काळजी घ्यावी.

Homemade Facepack For Oily Skin | yandex

तेलकट त्वचेसाठी फेसपॅक

तेलकट त्वचेमुळे चेहऱ्यावर धूळ लवकर साचते आणि पिंपल्सचा त्रास होतो. यासाठी तुम्ही घरच्या घरी सोप्य पद्धतीने फेसपॅक लावा.

Oily skin | yandex

मुलतानी माती आणि गुलाबपाणी

मुलतानी माती त्वचेतील अतिरिक्त तेल शोषून घेते  आणि त्वचा स्वच्छ करते यासाठी तुम्ही मुलतानी माती आणि गुलाबपाणी मिक्स करून चेहऱ्याला लावा.

Multani Mitti | Saam Tv

बेसन आणि लिंबू

बेसन त्वचेला स्वच्छ करते म्हणून बेसनमध्ये लिंबाचा रस मिक्स करून तुम्ही त्वचेवर लावा.

Besan facepack

दही आणि मध

दही त्वचेला थंड करते आणि मध जिवाणूंना (Bacteria) नष्ट करण्यास मदत करते. १ चमचा दह्यात अर्धा चमचा मध मिसळून चेहऱ्याला लावा आणि १० मिनिटांनी धुवा.

curd | yandex

कोरफड आणि हळद

कोरफड जेल त्वचेला चिकट न करता ओलावा देते. ताज्या कोरफड जेलमध्ये चिमूटभर हळद मिसळून लावल्यास चेहऱ्यावरील जळजळ कमी होते.

Aloe vera Gel | GOOGLE

टोमॅटोचा रस

टोमॅटोमध्ये नैसर्गिक ऍसिड असते जे तेलकटपणा कमी करून त्वचेचा रंग उजळण्यास मदत करते. टोमॅटोचा गर थेट चेहऱ्याला लावून १५ मिनिटे ठेवा.

Tomato | yandex

NEXT: Long Hair Growth Tips: लांब आणि घनदाट केसांसाठी नाश्त्याला खा हा पदार्थ, केसांची होईल भरभर वाढ

येथे क्लिक करा...