Manasvi Choudhary
केसांच्या वाढीसाठी तुम्ही घरगुती तेल लावणं अत्यंत फायदेशीर आहे.
घरीच्या घरी तुम्ही केसांसाठी तेल बनवा ज्यामुळे तुमच्या झपाट्याने वाढ होण्यास मदत होईल.
कढीपत्ता, आवळा, मेथीदाणे, आणि जास्वदांची फुले हे तेल बनवण्यासाठी साहित्य लागणार आहे.
केसांना कढीपत्ता, आवळा, मेथीदाणे, आणि जास्वदांची फुले यापासून बनवलेले तेल लावल्याने केसांची वाढ मुळापासून होते.
एका लोखंडाच्या कढईमध्ये तुम्ही गरम तेलामध्ये कढीपत्ता, आवळा, मेथीदाणे, आणि जास्वदांची फुले हे घाला आणि चांगले काळपट होईपर्यत शिजवून घ्या.
हे तेल थंड झाल्यानंतर एका काचेच्या बाटलीमध्ये भरून ठेवा. तुम्ही आठवड्यातून दोन वेळा हे तेल लावल्याने केसांना पोषण मिळण्यास मदत होते केसांची वाढ होते.
केसांना तेल लावल्यानंतर हलक्या हाताने मसाज करायला विसरू नका यामुळे डोक्याचे रक्ताभिसरण सुधारण्यास मदत होते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.