Manasvi Choudhary
आजकाल वाढते प्रदूषण, रोजच्या चुकीच्या सवयी आणि केमिकल प्रॉडक्ट्सचा अतिवापर केल्याने केसांच्या समस्या वाढतात.
केसांच्या निरोगी आरोग्यासाठी केमिकलयुक्त उत्पादनांपेक्षा तुम्ही घरच्या घरी काही उपाय करू शकता.
स्वयंपाकघरातील कढीपत्त्याचा वापर तुम्ही केसांसाठी करा यामुळे केसांची मुळापासून वाढ होईल. कढीपत्त्यामध्ये असलेले पोषक घटक केसांच्या मुळांना मजबूत करतात, ज्यामुळे केसांचे गळणे थांबते.
घरगुती तेल बनवण्यासाठी ताजी कढीपत्त्याची पाने, खोबरेल तेल आणि मोहरीचे तेल हे साहित्य घ्या.
गॅसवर एका कढईत खोबरेल तेल गरम करा. तेल हलके गरम झाल्यावर त्यात स्वच्छ धुतलेली कढीपत्त्याची पाने टाका.
हे संपूर्ण मिश्रण व्यवस्थित मिक्स केल्यानंतर चांगले उकळून घ्या. तेल थंड झाल्यानंतर गाळून एका बाटलीमध्ये भरा
केस धुण्याच्या अर्धातास आधी तुम्ही हे घरगुती तेल केसांना लावा आणि मालिश करा यामुळे केसांची वाढ होईल.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.