ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
कच्च्या केळ्यांपासून बनवलेली भाजी चविष्ट असते आणि त्यांच्या चिप्सही चविष्ट असतात. चहासोबत कुरकुरीत चिप्स खाणे म्हणजे एक आनंद आहे. केळ्याचे चिप्स कसे बनवावे ते जाणून घ्या.
केळ्याचे चिप्स बनवण्यासाठी कच्चे केळी, नारळ तेल, मीठ, हळद आणी पाणी इत्यादी साहित्य लागते.
कच्या केळ्यांना साफ धुवून घ्या. धुतल्यानंतर स्लाइसमध्ये कापून घ्या.
हळद आणि मीठाचे पाणी बनवून घ्या. त्यात कापलेले केळ्याचे स्लाइस टाका. ते ५ मिनिटे नीट भिजू द्या.
कापलेली केळी पाण्यातून बाहेर काढा आणि थोडा वेळ तसेच राहू द्या. स्लाइस पूर्णपणे सुकू द्या.
एक मोठी कढई घ्या. त्यात तेल गरम करण्यासाठी ठेवा.
नंतर बाहेर काढलेल्या केळ्यांच्या स्लाइसला सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या.
केळीच्या चिप्सवर वरुन मीठ आणि मिरपूड घालून खाण्याचा आनंद घ्या. हे चिप्स कुरकूरीत आणि टेस्टी लागतील.