ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
बटाट्याचे फ्राईज हे लहान मुलांना खूप आवडतात. ते सॉससोबत खाऊ शकतात.
एका पॅनमध्ये तेल गरम करा. बटाटे पातळ काप करा आणि पॅनमध्ये तळा. ते हलके तपकिरी झाल्यावर बाहेर काढा.
बटाट्याचा कचलू बनवणे सोपे आहे. लहान मुले हा पदार्थ आवडीने खातात आणि बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही.
बटाटे उकळून घ्या आणि त्यांना गोल आकारात कापून घ्या. त्यात गरम मसाला, मिरची, चिंच, मीठ, जिरेपूड आणि धणेपूड घाला आणि मिक्स करा. तुमचा कचलू झाला असेल.
जर तुम्हाला झटपट हलका नाश्ता हवा असेल तर बटाट्याचे चिप्स बनवा. बटाट्याचे चिप्स चहासोबत छान लागतात.
बटाटा टिक्की तुम्ही सहज सोपी नाश्ताला बनवू शकता. त्या खाल्याने पोट भरलेले वाटते आणि टिक्की चविष्टसुध्दा लागतात.
बटाटे उकळून त्यांना टिक्कीचा आकार द्या. नंतर ते एका पॅनमध्ये तेलावर तळा. हिरवी किंवा लाल चटणी बनवा आणि त्यासोबत सर्व्ह करा.
बटाटा पकोडे हे तुम्ही जेवणासोबत खाऊ शकता. तसेच ते बनवणे सुध्दा खूप सोपे आहे. लहान मुलांसाठी ही डिश तुम्ही बनवू शकता.