Siddhi Hande
चॉकलेट हे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडते. तुम्ही घरच्या घरी अवघ्या काही मिनिटांत चॉकलेट बनवू शकतात.
चॉकलेट बनवण्यासाठी तुम्हाला पिठी साखर, नारळ तेल किंवा कोकोआ पावडर, व्हॅनिला इसेन्स, दूध पावडर आणि कोको पावडर आवश्यक आहे.
सर्वात आधी तुम्हाला एका मोठ्या भांड्यात पाणी गरम करण्यासाठी ठेवायचे आहे. पाणी गरम झाल्यावर त्यात एक वाटी ठेवा. त्यात नाराळाचे तेल टाका.
त्यात साखर, कोको पावडर आणि दूध पावडर टाका.
यानंतर व्हॅनिला इसेन्स टाका. त्यानंतर व्यवस्थित मिक्स करा.
जेव्हा हे सर्व मिश्रण गुळगुळीत होईल. त्यात कोणत्याही गुठल्या नसाव्यात.
यानंतर तुम्हाला सिलिकॉन मोल्डमध्ये हे मिश्रण टाका. तुम्ही या चॉकलेटमध्ये ड्रायफ्रुट्सदेखील टाकू शकता.
यानंतर चॉकलेट सेट करण्यासाठी दोन तास फ्रीजमध्ये ठेवा.
यानंतर दोन तासानंतर चॉकलेट बाहेर काढा. त्यानंतर सिलिकॉन मोल्डमधून हलक्या हाताने काढून घ्या.