ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
चीजचा वापर बर्गर, पिझ्झा आणि सँडविच सारख्या पदार्थांमध्ये केला जातो. यामुळे जेवणाची चव वाढते.
आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, चीज खाल्ल्याने कोणकोणते फायदे होतात, जाणून घ्या.
चीजमध्ये प्रोटीन, कॅल्शियम, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी १२, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन के झिंक आणि ओमेगा -३ फॅटी अॅसिड सारखे पोषक तत्व असतात.
चीजमध्ये कॅल्शियम असते, कॅल्शियममुळे हाडं मजबूत होतात. म्हणून हाडं मजबूत करण्यासाठी चीज खाल्ले पाहिजे.
ज्या लोकांना हाय बीपीचा त्रास आहे त्यांनी डाएटमध्ये चीजचा समावेश करावा. यामुळे बीपी नियंत्रणात राहण्यास मदत होते.
डोळ्यांना निरोगी ठेवण्यासाठी चीजचे सेवन करा. यामध्ये व्हिटॅमिन ए असते. जे डोळ्यांना हेल्दी ठेवते.
जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर डाएटमध्ये चीजचा समावेश करा. यामुळे मेटबॉलिजम रेट बूस्ट होतो.