ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
प्रोटीन शरिराकरिता अत्यंत गरजेचे असते. तसेच घरी बनवला जाणारा प्रोटीन शेक सर्वात बेस्ट मानला जातो. तर जाणून घ्या चॉकलेट प्रोटीन शेकची रेसिपी.
छोटे तुकडे केलेले सफरचंद, एक चमचा आलमंड बटर, एक चमचा ग्रेटेड डार्क चॉकलेट, एक चमचा कोको पावडर, एक कप दूध, आर्धा कप दही आणि दोन भिजलेले खजूर.
या सर्व गोष्टींना एकत्र करुन ब्लेंडरमध्ये टाकून मिक्स करा. यात तुम्हाला हवे असल्यास बर्फ सुध्दा टाकू शकता.
तसेच प्रोटीन शेकमध्ये तुमच्या आवडीचे ड्राय फ्रुट्स सुध्दा टाकू शकता. ड्राय फ्रुट्स टाकल्याने प्रोटीन शेक अधिक पौष्टिक होईल.
जर तुम्हाला प्रोटीन शेकमध्ये दूध नको असल्यास तुम्ही पाण्याचा वापर करु शकता. अनेक जण प्रोटीन शेक हा पाण्यासोबत बनवतात.
तज्ञांच्या म्हण्यानुसार, जर तुम्हाला मसल्स बनवण्यावर फोकस करायचे असेल तर, दूधासोबत प्रोटीन शेक घेणे फायद्याचे ठरु शकते.
वजन कमी करण्यावर किंवा कमी कॅलरीयुक्त आहारावर लक्ष केंद्रित करणाऱ्यांसाठी, दुधापेक्षा पाणी हा एक चांगला पर्याय असू शकतो.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.