Siddhi Hande
चहाला वेळ नसते पण वेळेला चहा हवाच, असं म्हणतात.
फक्कड चहा प्यायल्यानंतर आपोआप एनर्जी येते. चहा बनवताना त्यात एक चमचाभर मसाला टाकला तर त्याची चव काही वेगळीच लागते.
तुम्ही घरीच चहाचा मसाला बनवू शकतात.
लवंग, मिरे, दालचिनी,वेलची, मसाला वेलची, जायफळ, सुंठ पावडर, ज्येष्ठमध पावडर, बडीशेप, खडीसाखर
सर्वात आधी तुम्हाला लवंग, वेलची, मिरी, दालचिनी आणि बडीशेप मंद आचेवर भाजून घ्यायचे आहे.
यानंतर वेलचीचे टरफलं काढून टाका. वेलचीदेखील भाजून घ्या.
हे सर्व भाजून झाल्यानंतर थंड होऊ द्या.
मिश्रण थंड झाल्यावर मिक्सरमध्ये टाका. त्यात ज्येष्ठमधाची पावडर, सूंठ पावडर, खडीसाखर टाकून छान बारीक करुन घ्या.
यानंतर तुमचा चहाचा मसाला तयार झालेला आहे. हा तुम्ही बरेच दिवस स्टोअर करुन ठेवू शकतात.
चहा बनवताना तुम्ही चहापावडर, साखर टाकल्यानंतर हा मसाला टाका.
चहा छान उकळल्यानंतर त्यात दूध टाका. या चहाची चव खूपच मस्त असते.