Saam Tv
वय वाढत जाते तसे चेहऱ्यावर सुरकुत्या येऊ लागतात आणि चेहरा निस्तेज होतो. काही घरगुती उपाय तुमची त्वचा तरूण आणि ग्लोईंग करू शकतात.
हळद, बेसन, दही आणि लिंबाचा रस सर्व मिश्रण एकजीव करा. २० मिनिटे चेहऱ्यावर लावा. नंतर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा. दह्यामुळे त्वचेला ओलावा मिळेल आणि लिंबाचा रस त्वचेला फ्रेशनेस देईल.
अंड्याचा फेसपॅक करताना त्यातील बल्क काढावा. उरलेल्या अंड्यात मध आणि लिंबाचा रस मिसळा. १५ मिनिटांनी थंड पाण्याने चेहरा धुवा. यामुळे त्वचेला घट्टपणा मिळेल.
कुस्करलेल्या पपईत मध मिसळा. हे मिश्रण २० मिनिटे चेहऱ्यावर असू द्या. पपईमधील गुणधर्मांमुळे मृत त्वचा निघून जाते.
किसलेल्या काकडीतमध्ये गुलाबपाणी मिसळा. व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर चेहऱ्यावर लावा. यामुळे त्वचेला थंडावा मिळेल.
ओट्स आणि दही एकत्र करून त्यात मध मिसळा. मग २० मिनिटे हे पॅक चेहऱ्याला लावा. यामुळे त्वचा एक्सफोलिएट होईल आणि मधामुळे फ्रेशनेस मिळेल.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.