Tanvi Pol
ताज्या आवळ्यांना स्वच्छ धुऊन मधून दोन भाग करुन घ्या.
आवळ्याची बी काढून टाका आणि त्याचे लहान तुकडे करा.
कढईत आवळ्याचे तुकडे थोडेसे सुकवून घ्या.
त्यात थोडे मीठ, साखर, जिरं पूड, काळं मीठ, लिंबू रस मिसळा.
साहित्य नीट मिक्स करून २ ते ३ दिवस उन्हात वाळवा.
वाळल्यानंतर हवाबंद डब्यात भरून ठेवा.
ही सुपारी तोंडाला चव आणणारी आणि पचनासाठी उपयोगी ठरते.