ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
उन्हाळात अनेक गंभीर आजार आणि त्वचेच्या समस्या होतात. लोकांना अनेकदा खाज सुटणे, पुरळ येणे आणि अॅलर्जीचा त्रास होतो.
उन्हाळात लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकजण हा घामोळ्यांना त्रस्त झालेला असतो. शरीरावर लाल रंगाचे लहान पुरळ येऊन खाज येऊ लागते.
जर तुम्ही देखील घामोळ्यांना त्रस्त होत असल तर, काही घरगुती उपायांचा वापर करुन बघा.
शरीरावर आलेल्या घामोळ्यांवर तुम्ही बर्फ लावू शकता. घामोळ्यांवर हळूवारपणे बर्फाने शेका.
बर्फ एका सुती कापडात गुंडाळा आणि घामोळ्या आलेल्या भागावर ठेवा. यामुळे थंडावा मिळेल आणि घामोळ्या लवकर कमी होण्यास मदत होईल.
घामोळ्यांकर तुम्ही मध देखील लावू शकता. मधात अॅंटीबॅक्टेरियल गुण असतात जे त्वचेला खाज आणि जळजळीपासून आराम देतात.
एका भांड्यात मध घ्या. ते घामोळ्या आलेल्या भागावर लावा आणि अर्ध्या तासानंतर पाण्याने धुवून घ्या.
नारळाच्या तेलाचा थंडावा असतो म्हणून रात्री झोपण्यापूर्वी ते घामोळ्यांवर दररोज लावा.
घामोळ्यापासून मुक्त होण्यासाठी तुम्ही गुलाबपाणी देखील लावू शकता. यामुळे थंडावा मिळेल आणि घामोळ्या लवकर कमी होण्यास मदत होईल.
घामोळ्या टाळण्यासाठी, सुती कपडे घाला आणि डेटॉल पाण्याने आंघोळ करा. यामुळे त्वचेच्या समस्या टाळता येतील.