ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
पावसाळ्यात अनेकांना कपड्यांबाबत अनेक समस्या येतात. कपड्यांना कुबट वास येऊ लागतो.
पावसाळ्यात कपड्यांना येणाऱ्या घाण वासामुळे ते कपडे घालायची इच्छा होत नाही.
आज आम्ही तुम्हाला पावसाळ्यात कपड्यांमधून येणारा दुर्गंध कसा दूर करायचा यासाठी टिप्स सांगणार आहोत.
कपडे धुताना नेहमी बेकिंग सोडा घालून कपडे धुवावेत.
कपडे धुताना लिंबाचा रस आणि बेकिंग पावडरचा वापर करा यामुळे देखील कपड्यातील वास दूर होईल.
कपडे फॅनखाली चांगले वाळवा कपडे ओले राहिल्यास कपड्यामधून वास येतो.
पावसात कपड्यांमधून चांगला वास येण्यासाठी तुम्ही क्लोथ वॉश लिक्विड वापरु शकता.