Mosquito : घराच्या प्रत्येक कोपऱ्यात डास? ना कॉइल, ना स्प्रे! मच्छर-माशा पळवण्यासाठी वापरा 'हा' ९९% देसी उपाय

Shreya Maskar

डासांचा उपद्रव

संध्याकाळ होताच घरात आणि आजूबाजूच्या परिसरात डासांचा उपद्रव वाढतो. डास घरात शिरू लागतात आणि झोपेत व्यत्यय आणतात.

Mosquito infestation | pinterest

घरगुती उपाय

डासांना पळवून लावण्यासाठी बाजारात महागडे रासायनिक डास प्रतिबंधक उपलब्ध आहेत, मात्र यामुळे डासांपासून काही काळापुरताच आराम मिळतो. त्यापेक्षा घरगुती उपाय करा.

Home remedies | pinterest

कडुलिंबाची पाने

एका छोट्या वाटीत थोडे तेल गरम करून त्यात वाळलेली कडुलिंबाची पाने, लवंग, लसूण आणि कांद्याची पाने टाका. सुगंध वाढवण्यासाठी कापूरची गोळी मिक्स करा.

Neem leaves | pinterest

कांद्याचा दिवा

डासांना दूर ठेवण्यासाठी कांद्याचा दिवा बनवा. एक कांदा घ्या आणि त्यात एक लहान छिद्र करा. कांद्यात हे मिश्रण भरा, वात ठेवा आणि दिवा लावा.

onion lamp | pinterest

धूर-सुगंध

कांद्याचा दिवा संध्याकाळी मोकळ्या जागेत ठेवा जेणेकरून त्याचा सुगंध संपूर्ण घरात पसरेल. त्याचा वास आणि धूर डासांना दूर ठेवण्यास मदत करू शकतात.

smoke-smell | pinterest

डास प्रतिबंधक

तयार केलेले तेल एका रिकाम्या बाटलीत गाळून घ्या आणि ते डास प्रतिबंधकामध्ये टाका. यामुळे संपूर्ण घरात नैसर्गिक सुगंध पसरेल आणि डासांना दूर ठेवण्यास मदत होईल.

Mosquito repellent | pinterest

घरात कोणती काळजी घ्याल?

संध्याकाळच्या वेळी दारे- खिडक्या गरज नसल्यास चालू ठेवू नका. तसेच खिडक्यांना जाळी लावा. जेणेकरून डास, मच्छर, माशा घरात शिरणार नाही.

What care will you take at home? | pinterest

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

Note | pinterest

NEXT : किचनचा ओटा स्वच्छ करण्याची स्मार्ट ट्रिक, तेलाचे हट्टी डाग अन् चिकटपणा चुटकीसरशी होईल गायब

Kitchen Ota Cleaning Trick | AI PHOTO
येथे क्लिक करा...