ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
फ्रिजमध्ये सडलेलं अन्न, सांडलेले पदार्थ किंवा बंद कंटेनरमधला वास जमा होतो आणि यामुळे फ्रिजमध्ये बुरशीसारखा वास येण्यास सुरुवात होते.
फ्रिजमधील वास घाालविण्याकरिता बेकिंग सोडा हा सर्वोत्तम उपाय आहे. एका बाऊलमध्ये थोडा बेकिंग सोडा घ्या आणि फ्रिजमध्ये ठेवा. बेकिंग सोडा सर्व वास शोषून घेतो. आठवड्याने बेकिंग सोडा बदलावा.
फ्रिजमध्ये थोडी कॉफी पावडर छोट्या प्लेटमध्ये ठेवा. ती दुर्गंधी शोषते आणि फ्रिजला ताजातवाना सुगंध देते.
कापलेले लिंबूचे तुकडे एका बाऊलमध्ये ठेवा. फ्रिजचा वास नाहीसा होईल आणि ताजेपणा वाढेल.
एका वाटीत पाणी आणि २ चमचे व्हिनेगर मिसळून फ्रिजमध्ये ठेवा. फ्रिजचा वास शोषून घेते आणि बॅक्टेरिया मारते.
आठवड्यातून एकदा तरी फ्रिजची सफाई करा. फ्रिज रिकामा करून आतील शेल्फ ओल्या कपड्याने पुसा.
फ्रिजला थोडी हवा लागूद्या कधीकधी फ्रिज थोडा वेळ उघडा ठेवा. आतल्या वासाला बाहेर येऊ द्या आणि कूलिंग बंद ठेवायला विसरू नका.