Shreya Maskar
ओठ आणि ओठांच्या आजूबाजूची त्वचा काळवंडली असेल, पिगमेंटेशन झाले असेल तर दह्याची पेस्ट ओठांना लावा. तुमची त्वचा काही मिनिटांत चमकेल.
दह्याची पेस्ट बनवण्यासाठी बाऊलमध्ये दही, मध , हळद, बेसन, तांदळाचे पीठ मिक्स करा. यांचे योग्य प्रमाण घ्या.
मिश्रण छान मिक्स करून फ्रिजमध्ये थंड होण्यासाठी ठेवा. तयार पेस्ट ओठांना आणि आजूबाजूच्या त्वचेला लावा. जास्तीत जास्त १५-२० मिनिटे तुमच्या त्वचेला ही पेस्ट लावा.
त्यानंतर ओठ, चेहरा धुवून घ्या आणि मॉइश्चराइजर लावा. जेणेकरून त्वचा हायड्रेट राहील. कोरडी होणार नाही.
रात्री झोपण्याआधी गायीचे शुद्ध तूप ओठांना आणि आजूबाजूच्या त्वचेला लावा. सकाळी ओठ मऊ होतील तसेच त्वचा उजळण्यास मदत होते.
बरेच लोकांना वारंवार ओठांवरून जीभ फिरवायची सवय असते. ज्यामुळे ओठांचे पिगमेंटेशन होऊ शकते. त्यामुळे वेळीच हा घरगुती उपाय करा.
शरीरातील व्हिटीमिन्स व्हिटॅमिन बी 12 कमी झाले तरी ओठ काळे पडतात. त्यामुळे चांगले पौष्टिक अन्न खा.
घरी बनवलेले कोणतेही ब्युटी प्रोडक्ट लावण्याआधी त्याची पॅच टेस्ट करा. जेणेकरून आपल्याला त्वचेला कोणताही इजा होणार नाही, कारण आपली त्वचा खूप संवेदनशील असते.