ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
अनेकदा झोपून उठल्यानंतर डोळ्यांच्या खाली सूज आणि डार्क सर्कल्स आलेले असतात. सूज आल्यामुळे चेहऱ्याचा लूक खराब दिसतो.ते कमी करण्यासाठी तुम्ही काही घरगुती डोळ्यांचे मास्क वापरून उपाय करु शकता.
काकडी किसून घेवून त्याचा रस काढून घ्या. मग त्यात गुलाबपाणी मिक्स करा. या मिश्रणाला डोळ्यांच्या खाली १५ मिनिटे लावून ठेवा.
गाजराचा रस काढून घ्या आणि त्यात कोरफडीचा गर मिक्स करा. या पेस्टला डोळ्याच्या खाली लावा. हा मास्क लावल्याने सूजेपासून मुक्तता मिळते.
बटाटा हा डार्क सर्कल आणि पफीनेस कमी करण्यास मदत करतो. बटाट्याला कापून घ्या आणि काप डोळ्यांच्या खाली ठेवा.
कॅफिन डोळ्यांची सूज कमी करते आणि त्वचा उजळवते. कॉफी पाण्यात मिक्स करा आणि पेस्ट म्हणून लावा.
कोरफडीचे मास्क डोळ्यांखालची सूज कमी करतात. कोरफडीचे जेल डोळ्यांखाली लावा आणि १५ मिनिटे तसेच राहू द्या. नंतर पाण्याने धुवा.
तुम्ही तुमच्या डोळ्यांखाली दही देखील लावू शकता. यामुळे सूज कमी होण्यास मदत होईल. तुम्ही दह्यात लिंबू देखील घालू शकता.
डोळ्यांखालील सूज कमी करण्यासाठी ग्रीन टीचा वापर देखील करता येतो. काकडीचा रस ग्रीन टीमध्ये मिसळा आणि डोळ्यांखाली लावा.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.