Manasvi Choudhary
चेहऱ्यावरील पिंपल्स कमी करण्यासाठी महागड्या उत्पादनांपेक्षा घरगुती उपाय प्रभावी आहेत.
चेतील जास्तीचे तेल, धूळ आणि हॉर्मोनल बदल ही पिंपल्स येण्याची मुख्य कारणे आहेत. यासाठी नेमके काय करावे हे जाणून घ्या.
कडुलिंबामध्ये बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म असतात. कडुलिंबाची पाने वाटून त्याची पेस्ट पिंपल्सवर लावा. २० मिनिटांनी थंड पाण्याने चेहरा धुवा.
१ चमचा मध आणि अर्धा चमचा दालचिनी पावडर एकत्र करून फक्त पिंपल्स असलेल्या जागी लावा. यामुळे पिंपल्सची सूज आणि लालसरपणा कमी होतो.
कोरफड जेल आणि चिमूटभर हळद एकत्र करून चेहऱ्याला लावा. कोरफड त्वचेला शांत करते, तर हळद इन्फेक्शन रोखते.
पिंपल खूप दुखत असेल किंवा सुजलेला असेल, तर एका सुती कपड्यात बर्फाचा खडा घेऊन तो पिंपलवर १-२ मिनिटे ठेवा. यामुळे सूज त्वरित कमी होते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला द्या