ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
अॅसिडिटी म्हणजे पोटात जास्त आम्ल आणि गॅस तयार होणे. यामुळे छातीत जळजळ, मळमळ,आंबट ढेकर आणि पोटदुखी यांसारख्या समस्या जाणवतात. चुकीचा आहार, ताणतणाव व अनियमित जेवण यामुळे अॅसिडिटी होते.
सकाळी उठल्यावर उपाशीपोटी एक ग्लास कोमट पाणी प्यायल्याने पोट स्वच्छ राहण्यास मदत होते आणि आम्लाचे प्रमाण हळूहळू कमी होते. तसेच दिवसभर पुरेसे पाणी पिणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
जेव्हा तुम्हाला अॅसिडिटी झाल्याचे जाणवेल तेव्हा एक कपभर थंडगार दूध साखर न टाकता प्या. थंड दूध अॅसिडिटी कमी करण्यास मदत करते.
जेवणानंतर थोडे भाजलेले जिरे चावल्यास पचन सुधारते आणि अॅसिडिटी कमी होते.
केळी हे अॅसिडिटीसाठी चांगले फळ आहे. रोज एक केळी खाणे फायदेशीर ठरते. केळी पोटातील आम्ल शोषून घेतात आणि छातीत होणारी जळजळ कमी करते.
तुळशीची 3 ते 4 पाने चावून खाल्ल्यास किंवा तुळशीचा काढा प्यायल्यास अॅसिडिटीवर आराम मिळतो. तुळस पचनक्रिया सुधारते.
जास्त ताणतणावामुळे अॅसिडिटी वाढते. प्राणायाम आणि पुरेशी झोप घेतल्याने पोटाचे आरोग्य सुधारते.
खूप तिखट, तेलकट, आंबट पदार्थ, चहा-कॉफी यांसारखे पदार्थांचे सेवन केल्याने छातीत जळजळ सुरु होते. तसेच रात्री उशिरा जेवण केल्यानेही अॅसिडिटी वाढवते.
वेळेवर आणि थोडेथोडे जेवण केल्यास अॅसिडिटीचा त्रास कमी होतो. घरगुती, साधे आणि पचायला हलके असे पदार्थ खावे.